अलिबाग तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी राजकीय बळकटी मिळाली आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या विचारांवर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवत अनेक स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा अलिबाग तालुक्यातील सारळ, नवखार आणि मिळखतखार ग्रामपंचायतींचे माजी सदस्य तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. या सर्वांनी अमित नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेश करणाऱ्यांमध्ये श्री. सुशिल पाटील, श्री. महेंद्र थळे, श्री. पार्थ पाटील, श्री. चेतन पाटील, श्री. साई भगत, श्री. सनी पाटील, श्री. विश्वास पाटील, श्री. जगदीश म्हात्रे, श्री. गणेश ठोंबरे, श्री. वसंत पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी उपस्थित नेतृत्वाने सर्व नवप्रवेशितांचे स्वागत केले आणि त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.