Tuesday, 27 October 2026 Pune, Maharashtra
महाराष्ट्र

वैकुंठ स्मशानभूमीच्या पार्किंगमध्ये कचरा गाड्यांचा तळ! नागरिकांची गैरसोय, प्रशासनावर संताप

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी राखीव पार्किंगच्या जागेवर कचरा वाहतूक करणारी वाहने उभी केली जात असल्याची तक्रार आहे. यामुळे पार्किंगची समस्या, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

संपादकीय विभाग
14 Aug 2026, 05:55 PM
5,158 वाचले
News Image

शहरातील प्रमुख वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी राखीव असलेल्या पार्किंगच्या जागेच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या जागेवर महापालिका आणि खासगी ठेकेदारांच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या मोठ्या संख्येने उभ्या केल्या जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे दुःखाच्या प्रसंगी अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहन पार्क करण्यासाठी जागा शोधताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्मशानभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारा शेजारी वाहनतळासाठी मोकळी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र, या परिसरात घंटागाड्या तसेच कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांची वाहने नियमितपणे उभी राहत असल्याचा आरोप आहे. संबंधित वाहनांची पार्किंग, देखभाल आणि चालक-कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी ठेकेदारांची असताना महापालिकेच्या नागरिकांसाठी राखीव जागेचा वापर कचरा वाहनांसाठी का केला जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याशिवाय कचरा वाहनांमधून सांडपाणी गळून ते परिसरात साचत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारची अस्वच्छता असणे योग्य नसल्याची नाराजीही व्यक्त केली जात आहे.

पार्किंगच्या जागेच्या खालच्या बाजूस वैकुंठेश्वर महादेव मंदिर असल्याचे सांगण्यात येते. मंदिर परिसरातही कचऱ्याचे सांडपाणी आणि टाकाऊ पदार्थ वाहत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे भाविक आणि सेवाभावी कार्यकर्त्यांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.

नागरिकांसाठी राखीव पार्किंगची जागा मोकळी करून परिसराची स्वच्छता राखावी आणि कचरा वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आता या तक्रारीवर महापालिका प्रशासन काय कारवाई करते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले