पुणे : दुचाकीस्वार डॉक्टर महिलेशी अश्लील वर्तन करणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लष्कर भागातील गोळीबार मैदान चौकात ही घटना घडली.
तक्रारदार डॉक्टर महिला दुचाकीवरुन लष्कर भागातील गोळीबार मैदान चौकातून निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपी शेलार दुचाकीवरुन विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आला. त्याने दुचाकीस्वार डॉक्टर महिलेला धडक दिली. त्यानंतर डॉक्टर महिलेने त्याला जाब विचारला. तेव्हा शेलारने त्यांना शिवीगाळ करुन अश्लील वर्तन केले. त्याने डॉक्टर महिलेशी झटापट करून जीवे मारण्याची धमकी दिली.
विनयभंग, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेलारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
Leave a Reply